エピソード

  • # 1635: कन्या जन्माचा हरित सोहळा! लेखक : शैलेश चव्हाण. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/12/23

    Send us a text

    राजस्थान म्हटलं की स्त्री भ्रूणहत्या आणि त्यामुळे या राज्यातील मुलींचं घटते प्रमाण हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभा राहते. मात्र याच राज्यातील पिपलांत्री या छोट्याशा गावानं मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी दरवेळी 111 रोप लावून त्यांची जोपासना करण्याचा वसा अंगीकारला. मुलींच्या सन्मानासह पर्यावरण संरक्षणाचे मुलाचं कार्य हे गाव सन 2005 पासून सातत्याने करत आहे.

    続きを読む 一部表示
    7 分
  • # 1635: बलवत्तर नशिबाचे रडतराव लेखक डॉ. कैलास दौंड. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/12/21

    Send us a text

    काहींचे नशीब असे बलवत्तर असते की त्यांना सतत काही ना काही कारणाने यश मिळतच जाते. लोकांना अवघड वाटणारी कामे यांच्याकडून अनावधानाने सहजपणे होऊन जातात. त्यामुळे पाहणारे लोक देखील आश्चर्यचकित होतात. मात्र "हे का आश्चर्यचकित झाले आहेत?" हे संबंधितांना कळत सुद्धा नाही!
    अशीच एक लहानपणी ऐकलेली मजेशीर गोष्ट!

    続きを読む 一部表示
    7 分
  • #1634: कंटाळलात? मग आनंद माना! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/12/15

    Send us a text

    ‘मला कंटाळा आला आहे’ किंवा ‘मला काहीही करायचे नाही’ हे वाक्य आपल्यापैकी बरेच जण रोज ऐकतात किंवा आपण ते स्वतःच वापरतो. मात्र, एखादी गोष्ट कंटाळवाणी कशामुळे होते, याचा कधी विचार केलाय? त्याची असंख्य कारणे आहेत. सध्या आपल्याला सतत काही तरी सांगायची किंवा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याची सवय आहे. एक मिनिट जरी काही केले नाही, तरी आपल्याला कंटाळा येतो आणि कंटाळा येऊ नये, म्हणून जे काही करता येईल, ते आपण करत राहतो.

    続きを読む 一部表示
    8 分
  • # 1633: रद्दीवाला. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/12/15

    Send us a text

    रघू तसा बुद्धीनं यथातथाच. पण धंद्यात डोकं भारी चालायचं. कुठली रद्दी आहे, कुठल्या रद्दीला सेकंडमधे सोन्याचा भाव आहे, हे त्याला बरोबर कळायचं. कसाबसा बारावीपर्यंत शिकला. आन् धंद्याला लागला.

    वर्षभरात गणूकाका गेले, अन् रघूचा रघूशेट झाला. तसाच हसमुखराय चेहरा. गोडबोल्या स्वभाव. ईलेट्राॅनिक काट्यावर अचूक वजन करायचा. चोख भाव. हिशोबाला पक्का. दुकानाबाहेर वाचणेबल पुस्तकं , मासिकांचं प्रदर्शन. रद्दीवालं गिर्हाईक बाहेर घुटमळायचंच. जाताना एखादं पुस्तक घेऊन जायचंच जायचं.
    रद्दी टाकायला मी अजूनही लकडी पुलावर जातो. माझ्या आवडत्या खुर्चीवर बसून पुस्तकं चाळतो. फोटोतल्या गणूकाकांना भेटतो. मजा येते.

    続きを読む 一部表示
    8 分
  • # 1632 : "वाटा सहजीवनाच्या". लेखिका स्वाती पाटील. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/12/09

    Send us a text

    एकमेकांना समजून घेणे ही सहजीवनातली अपेक्षा असते. आई-बाबांचं एकमेकांशी निःशब्द समांतर सहजीवन असो किंवा विन्सेट वॉन गॉग व त्याचा भाऊ थिओ यांचे एकमेकांशी हळवे बंध असो, कोणत्याही दोन व्यक्तींमधील सहजीवनाच्या वाटा निरनिराळ्या असतात हेच खरे!

    続きを読む 一部表示
    6 分
  • # 1631: श्रीक्षेत्र जेजुरी आणि कडेपठार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/12/09

    Send us a text

    जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.

    続きを読む 一部表示
    10 分
  • # 1630 : "लाडकी बाहुली माझी माझी म्हणूनी" लेखिका : बागेश्री . कवयित्री : इंदिरा संत . कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    2024/12/08

    Send us a text

    "आपलं लाडकं माणूस ,जे कदाचित आपल्यापेक्षा जरा दुबळं आहे, जे फार व्यक्त होऊ शकत नाही.. कुठे हरवलं तर घरी परतू शकत नाही; अशा त्या माणसाला शोधायला आपणच निघायला हवं हे रुजलं. पण अशावेळी एखादवेळी आपल्यावरही पावसाळी मर्यादा येऊन पडतात, तेव्हा संयम अंगी बाणवत उघड पडेपर्यंत तग धरायची असते... हे ही समजलं."

    続きを読む 一部表示
    8 分
  • #1629 : हिंदी महासागरात आहे "ग्रॅविटी होल". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2024/12/03

    Send us a text

    अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० दशलक्ष वर्षांपूर्वी फुटला होता. सध्याचा आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, भारतीय उपखंड आणि अरबी द्वीपकल्प हे त्याचे भाग होते.

    続きを読む 一部表示
    7 分