-
サマリー
あらすじ・解説
Send us a text
‘मला कंटाळा आला आहे’ किंवा ‘मला काहीही करायचे नाही’ हे वाक्य आपल्यापैकी बरेच जण रोज ऐकतात किंवा आपण ते स्वतःच वापरतो. मात्र, एखादी गोष्ट कंटाळवाणी कशामुळे होते, याचा कधी विचार केलाय? त्याची असंख्य कारणे आहेत. सध्या आपल्याला सतत काही तरी सांगायची किंवा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होण्याची सवय आहे. एक मिनिट जरी काही केले नाही, तरी आपल्याला कंटाळा येतो आणि कंटाळा येऊ नये, म्हणून जे काही करता येईल, ते आपण करत राहतो.