-
サマリー
あらすじ・解説
Send us a text
अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याच्या निर्मितीमागील टेथिस समुद्र हे आता नामशेष झाले आहे. टेथिस समुद्राच्या मृत्यूनंतर हिंद महासागराचे रहस्यमय गुरुत्वाकर्षण छिद्र तयार झाल्याचे शास्त्रशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. टेथिस समुद्र एकेकाळी पृथ्वीच्या कवचाचा भाग होता, परंतु 180 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरील गोंडवाना या प्रदेशाच्या विघटनादरम्यान तो युरेशियन प्लेटच्या खाली गाडला गेला होता. अशाप्रकारे पृथ्वीच्या कवचाचे तुकडे या आवरणाखाली बुडाले. गोंडवाना हा एक प्राचीन महाखंड होता, जो १८० दशलक्ष वर्षांपूर्वी फुटला होता. सध्याचा आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, भारतीय उपखंड आणि अरबी द्वीपकल्प हे त्याचे भाग होते.