-
サマリー
あらすじ・解説
डॉ अमित करकरे यांच्यासोबत Rational self-suggestion अर्थात, RSS technique च्या या सत्रामधे मोबाईल फोनचा गरजेपेक्षा जास्त वापर समजून घेऊन स्क्रीन टाईम कमी करण्यावर आपण काम करणार आहोत. आपण एखादे महत्वाचे काम करत असताना वाजलेले प्रत्येक नोटीफिकेशन जर आपली एकाग्रता भंग करत असेल, त्यामुळे उगाच मोबाईलवर वेळ जाऊन आपले काम बाजूला पडत असेल, पाच दहा मिनिटे टाईमपास करु असं म्हणता म्हणता reel बघत अर्धा पाऊण तास कधी संपला हे समजत नसेल, दर काही वेळाने उगाचच काही कारण नसताना मोबाईल चेक करावासा वाटत असेल, आपण मोबाईल पासून दूर राहिल्याने एखादी महत्वाची बातमी किंवा मेसेज आपल्याला मिळणार नाही अशी भीती जर वाटत असेल तर या विवेकी-ध्यानाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. हे पॉडकास्ट रोज ऐकत राहीलात तर त्याचा जास्त फायदा दिसून येईल #RSS #GuidedMeditation #DrAmitKarkare #Mindfulness #HealthyLiving #WellnessJourney #MeditationForLife #marathi #mobile #mobilegame #addiction #mobileaddiction #screentime #motivation #bringinnerpeace #vipassanameditation #vipassana #mindfulnessmeditation #affirmations #innerpeace